मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महत्वपूर्ण अशी हि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे. या योजनेमधून प्रत्येक लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये शासनाकडून दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे, आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर आपला अर्ज मंजूर झाल्यानंतरच अर्जदार महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेल.

MMLBY-Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Highlights

योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
योजना कोणी सुरु केली
महाराष्ट्र शासन
लाभार्थी
महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, घटस्पोटीत महिला, परित्यक्त्या, निराधार महिला,
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन किंवा ऑफलाईन
अर्ज सुरु दिनांक
१ जुलै २०२४
मिळणारा लाभ
१५०० रुपये प्रती महिना
योजनेचे उद्दिष्ट
राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, रोजगार निर्मितीस चालना देणे, आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे.
लाडकी बहिण योजना official वेबसाईट
लाडकी बहिण योजना अँप
Narishakti Doot App (नारीशक्ती दूत अँप)
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
१५ ऑक्टोंबर २०२४

लाडकी बहिण योजना पात्रता Ladki Bahin Yojana Eligibility

  • अर्जदार महिलेचे वय वर्ष हे २१ ते ६५ दरम्यान असावे.
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणताही व्यक्ती (IT Return) आयकरदाता नसावा.
  • लाभार्थी महिलेला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर १५०० रुपये पेक्षा जास्त लाभ घेत असेल तर, त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम/नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि रु.२.५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

माझी लाडकी बहिण योजना कागदपत्रे Majhi Ladki Bahin Yojana Required Documents

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक (आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असावे.)
  • उत्पन दाखला (आपल्याकडे जर पिवळे/केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्न दाखला आवश्यक नाही.)
  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र (आपल्याकडे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड, २) जन्म दाखला, ३) शाळेचा दाखला, ४) मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक आवश्यक)
  • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक फॉर्म भरण्यासाठी आवश्यक
  • विहित नमुन्यातील अर्ज व हमीपत्र

लाडकी बहिण योजना Ofiicial वेबसाईट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज करण्यासाठी शासनाने ladakibahin.maharashtra.gov.in हे संकेस्थळ उपलब्ध करून दिले आहे. MMLBY योजनेची ladakibahin.maharashtra.gov.in हि अधिकृत वेबसाईट आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून अर्जदार महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याकडे देखील लाभार्थी अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व योजनेचे अटी व शर्तीचे हमीपत्र असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी लाभार्थीने सर्व कागदपत्रे असल्याची खात्री करावी, mmlby apply online ऑनलाईन करण्यासाठी सर्व प्रथम mmlby official website ladakibahin.maharashtra.gov.in मोबाईल मध्ये ओपन करावी. अर्ज करण्यापूर्वी सर्व प्रथम वेबसाईट वरती नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल. म्हणजेच आपले खाते तयार करावे लागेल. त्यानंतरच अर्ज करता येईल.

MMLBY has approved meaning

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरल्यानंतर लाभार्थींना MMLBY has Approved असा एसएमएस येत आहेत. या मेसेज चा अर्थ काय आहे, किंवा हा मेसेज कशाचा आहे? अनेकांना हा प्रश्न पडत आहे. ज्या अर्जदारांना MMLBY has Approved असा मेसेज आलेला आहे, अशा अर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा केलेला अर्ज हा मंजूर झालेला आहे. व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये प्रती महिना मिळणार आहे.

MMLBY म्हणजे काय (MMLBY Full form)

MMLBY म्हणजेच Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना) होय.

Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टेटस पाहण्यासाठी अजून पर्याय उपलब्ध नाही, म्हणजेच लाभार्थीला या योजनेचे पैसे जमा झाले कि नाही हे चेक करता येत नाही, पैसे जमा झाले कि नाही हे बँक मध्ये चेक करावे लागते. परंतु आपला अर्ज मंजूर झाला आहे का रिजेक्ट याचे स्टेटस चेक करता येते. आपला अर्ज Approved झाला आहे का? Reject झाला आहे? हे चेक करायचे असल्यास आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला आहे तेथे तुम्हाला अर्जाचे स्टेटस चेक करता येईल, म्हणजेच आपण अर्ज मोबाईल मधून वेबसाईट (mmlby status website) किंवा अँप वरून अर्ज भरला असेल तर त्यामध्ये स्टेटस पाहता येते, परंतु आपण जर आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र या ठिकाणी अर्ज भरला असेल तर तुम्हाला त्याठिकाणी जावून अर्जाचे स्टेटस चेक करता येईल.

MMLBY Online form

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येतो, तसेच ज्या लाभार्थींना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास ते ऑफलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत हि १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत देण्यात आली आहे. लाभार्थीने विहित कालावधी मध्ये ladki bahin yojana apply online योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.

लाडकी बहिण योजना यादी

लाभार्थीची पात्र लाभार्थी लिस्ट ऑनलाईन पाहू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट mmlby list maharashtra ऑनलाईन पोर्टल वरती पाहता येईल. यादी पाहण्यासाठी नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन मोबाईल मध्ये लाडकी बहिण योजनेची यादी पाहता येईल. जर लाभार्थीचे नाव यादीमध्ये नसेल तर लाभार्थीने काळजी करण्याची गरज नाही, आपला अर्ज मंजूर झालेला असेल तर लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यादी अपडेट झाल्यानंतर आपले नाव लिस्ट मध्ये येईल. परंतु आपला अर्ज MMLBY Approved झाला आहे का याची खात्री करावी.