लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नसतील तर हे काम करा ladki bahin yojana money not received
Ladki Bahin Yojana Money Not Received महाराष्ट्रात राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली असून महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये शासनाकडून दिले जात आहेत. यामुळे राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फायदा होत आहे.
Ladki bahin yojana money not received
लाडकी बहिण योजनेचे ज्या लाभार्थींनी अर्ज केलेला आहे व अर्ज मंजूर/Approved झालेला आहे, अशा पात्र लाभार्थी महिलांना १५०० रुपये मिळायला सुरुवात आहे. परंतु काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरून, अर्ज मंजूर/Approved होऊन सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत. अर्ज मंजूर होऊन सुद्धा पैसे का जमा झाले नाहीत? याबद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम हि पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. यामुळे महिलेचे आधार कार्ड हे बँक खात्यासोबत (DBT-NPCI) लिंक असणे आवश्यक आहे, तरच या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
अनेक महिलांना अर्ज Approved (मंजूर) होऊनसुद्धा पैसे मिळाले mmlby money not received नाहीत कारण, राज्यातील अनेक महिलांचे आधार कार्ड हे बँक खात्यासोबत जोडलेले (लिंक) नाही. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे पैसे जमा झाले नाही, तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे किंवा नाही हे चेक करणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे कि नाही हे आपण मोबाईल वरून चेक करू शकता, यासाठी बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे, हे चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
How to check ladki bahin yojana money not received
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले किंवा नाही याचे स्टेटस mmlby status track चेक करण्यासाठी सध्या पर्याय उपलब्ध नाही, परंतु आपण आधार कार्ड कोणत्या बँकेमध्ये लिंक आहे हे याचे स्टेटस चेक करू शकता, कारण ज्या बँकमध्ये आधार कार्ड लिंक आहे त्या बँकमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे स्टेट्स mmlby status maharashtra चेक करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्यानंतर या संदर्भात माहिती दिली जाईल.
आधार कार्ड कोणत्या बँकेमध्ये लिंक आहे? चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
टीप : आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे चेक करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ ही वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन करावी.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी Login हा पर्याय दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून आधार कार्ड क्रमांक टाका व खालील Captcha कोड भरून Log with OTP बटन वरती क्लिक करा.
- आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक सहा अंकी OTP/ओटीपी येईल तो ओटीपी टाकून Login/लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Bank Seeding हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा, क्लिक केल्यानंतर आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे. त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
- आधार कार्ड जर कोणत्याच बँकेत लिंक नसेल तर त्या ठिकाणी कोणतीही बँक दाखवणार नाही.
- Bank Seeding वरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी बँक Active स्टेटस असणे गरजेचे आहे.
- जर Bank Seeding हे InActive असेल तर आपण आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड व Bank Seeding करण्यासाठी चा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून बँकेत जमा करावा.
वरील माहितीद्वारे आपण आपले आधार कार्ड कोणत्या बँकमध्ये लिंक हे चेक करू शकता.
Maza from reject jhalela aahe aani mala edits option yet nahi please kya karaych sanga
फॉर्म App वरून भरला आहे कि वेबसाईट वरून.
Maja form reject zal tr mi ata kut apply Karu plzzz request
form edit karnyasathi option asel check kara.
Maza form August la manjur zala aani maz a/c he lagnacya pahili mazya gavi tulsulila sindhurga district Central Bank la hot pn aamhi te band karun talamba sindhurga district Central Bank madhe transfer Kel tr Kay maze paise pahilicya banket jau shaktat ka? Please reply
aadhar card kontya banket link aahe check kara.
Maza form approved zal ahe tari paise milale nahi .mi aadhi SBI che account number dilela hota .Ata postache khate kholale ahe pan ajun paise ale nahit please help!
post madhye jama hotil, aadhar card link aahe check karave
Mi majhi wife cha form bharala approve pan jhala august made sarv ok aahe pan pese aale nahi
maza form aogust madhe apporove jhala ac no adhar sobat link ahe mi postbank chedile ahe mala adhi yenar paise
adhar card post banket link kara
Mazha form23 aug.la approved jhala, aahey majha account link hi aahey kinva active hi aahe, tari hi suddha mala ladki bahin yojnacha hafte milale nahi, ashyat kaay karav lagtil
konti bank link ahe tya bank madhye check karave
Maza form Aug madhe approved zala ahe,bank account adhar la link ahe, account active sudha ahe . Ajun ek hi hafta ala nahi.