शेवटची संधी, लाडकी बहिण योजनेला मिळाली मुदतवाढ; mmlby last date of registration

ladki bahin yojana last date october

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे, यामुळे महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरता येणार आहे. जुलै पासून राज्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना शासनाकडून प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जातात.

लाडकी बहिण योजना शेवटची तारीख (mmlby last date of registration)

राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलांना अर्ज भरण्यासाठी शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले नसतील अशा महिलांना १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. परंतु शासनाने यामध्ये मोठा बदल केलेला आहे. आता महिलांना मोबाईल वरून अर्ज भरता येणार नाही, अंगणवाडी सेविका यांच्याकडे महिलांना अर्ज करावा लागेल. म्हणजेच अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरून अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज सादर करावा.

म्हणजेच आता अर्जदार महिलांना अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज भरावा लागेल. अर्ज भरण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचे बँक पासबुक (बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे)
  • २ लाख ५० हजार पेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्न दाखला (अर्जदाराकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास उत्पन दाखल्याची आवश्यकता नाही.
  • अधिवास प्रमाणपत्र (किंवा १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड, २) मतदान कार्ड, ३) जन्माचा दाखला, ४) शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक आवश्यक)
  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज व हमीपत्र
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर

Similar Posts

7 Comments

  1. Sir maje nav sonali Anil pawar maja form bharala approve pan jhala august made Your application no NYS-05263208-6697b7d5e8d8c4116 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV pese aale nahi please check kara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *