मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana-MMLBY

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : शासन राज्यातील महिलांसाठी विविध योजना राबविते, महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी विविध योजना राबविल्या जातात. आता राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, आता महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असेल? योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, अर्ज करण्यासाठी कोणती लागतात या संबधित सविस्तर माहिती, या लेखामध्ये दिलेली आहे. MMLBY-Mukhyamntri Majhi Ladki Bahin Yojana राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, निराधार महिला, घटस्पोटीत महिला इ. महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून झाली आहे.महाराष्ट्र राज्यातील महिलांना शासनाकडून १५०० रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा अर्थ संकल्पामध्ये करण्यात आली होती. राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थी महिलेचे वय २१ ते ६५ असावे.
  • २१ ते ६५ वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्पोटीत महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशन कार्ड
  • उत्पन्न दाखला (केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास उत्पन दाखल्याची आवश्यकता नाही)
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षापूर्वीचे १) रेशन कार्ड २) जन्म दाखला ३) शाळा सोडल्याचा दाखला ४) मतदार ओळखपत्र या पैकी कोणतेही एक आवश्यक)
  • योजनेचे अटी व शर्तीचे पालन करण्या बाबतचे हमीपत्र.
  • लाभार्थीचा मोबाईल क्रमांक
  • विहित नमुन्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

अर्जदार महिलांना अर्ज करण्यासाठी शासनाने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी महिला अंगणवाडी मध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये अर्ज करू शकतात, किंवा जवळील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच शासनाच्या ladki bahin yojana official website अधिकृत वेबसाईट वरती https://ladakibahin.maharashtra.gov.in/ अर्ज करू शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *